Aale Manat Majhya

आले मनात माझ्या, खुलली क्षणात आशा
सांगावया नको ते, तू जाणलीस भाषा
आले मनात माझ्या, खुलली क्षणात आशा
सांगावया नको ते, तू जाणलीस भाषा
आले मनात माझ्या

या मूक भाषणाचा, भावार्थ सर्व साधा
या मूक भाषणाचा, भावार्थ सर्व साधा
माझी मलाच ज्याची जडली अमोल बाधा
बाधेत भावनेची प्रणयात होई वर्षा

सांगावया नको ते, तू जाणलीस भाषा
आले मनात माझ्या

माझ्या मानातले हे नवनीत स्वप्न भोळे
प्रीतीस जाग येता साकार आज झाले
अधरी हसून बोले ही गोड हास्यरेषा

सांगावया नको ते, तू जाणलीस भाषा
आले मनात माझ्या, खुलली क्षणात आशा
सांगावया नको ते, तू जाणलीस भाषा
आले मनात माझ्या



Credits
Writer(s): Ashok Govind Patki, Aanavkar Ramesh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link