Hasale Mani Chandane

हसलें मनिं चांदणें
जपुनी टाक पाउलं साजणी नादतील पैंजणें

बोचतील ग फुलं जाइची तुझी कोमल काय
चांदण्यांतही सौंदर्या रे पोळतील ना पाय!

पानांच्या जाळींत लपोनी, चंद्र पाहतो गडे
सांग कुणाच्या भेटीसाठीं जीव सारखा उडे!

हो जरा, बघा कीं वरी, कळूं द्या तरी, उमटुं द्या वाणी
कां आढेवेढे उगाच सांगा काय लागलें राणी?

कां ग अशा पाठीस लागता मिळुनी सार्या जणी!
आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी

किती, किती ग भाग्याची
भलतीच ओढ ही कामसुंदराची
नव्हे ग शामसुंदराची
हसलें मनिं चांदणें



Credits
Writer(s): Raja Badhe, P L Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link