Malyachya Malyamandi

माळ्याचा माळ्यामध्ये कोण ग उभी
राखण करते मी रावजी

रावजी, हात नाका लावू जी पाहिल कुणीतरी ||

औदाच वरीस मी सोलावं गाठलं ग
चोळी दाटली अंगाला कापड का फाटलं ग
काळीज माझ धडधड करी
उडते पापणी वरचे वरी

रावजी, हात नाका लावू जी पाहिल कुणीतरी ||

नार गोमठी तू देखणी ठुस्का बांधा धसला मनी
फुलराणी जीव माझा साजणी जडला तुझ्यावरी

रावजी, हात नाका लावू जी पाहिल कुणीतरी ||

माळ्याचा माळ्यामध्ये कोण ग उभी
वांगी तोडते रावजी

रावजी, हात नाका लावू जी पाहिल कुणीतरी ||
गोऱ्या गालावरी ग माझ्या लाली लागली दिसू ग
अंघोळीला बसले मी ग माझ मलाच येई हसू ग
पदर राहीना खांद्यावरी पिसाट वारा भरला उरी
रावजी, हात नाका लावू जी पाहिल कुणीतरी ||
शुक्राची ग तू चांदणी लाजू नको ग नाही कुणी
मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा ग झाला खरोखरी



Credits
Writer(s): Madhurkar Pathak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link