Majhe Jeevan Gaane

माझे जीवन गाणे-गाणे
माझे जीवन गाणे-गाणे
माझे जीवन गाणे-गाणे

व्यथा असो, आनंद असू दे
व्यथा असो, आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे

वाट दिसो अथवा न दिसू दे
गात पुढे मज जाणे-जाणे
माझे जीवन गाणे-गाणे
माझे जीवन गाणे-गाणे

माझे जीवन गाणे, आ
माझे जीवन गाणे-गाणे

कधी ऐकतो गीत झऱ्यातुन
कधी ऐकतो गीत झऱ्यातुन
कधी ऐकतो गीत झऱ्यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
वंशवनाच्या कधी मनातुन

कधी वाऱ्यातुन, कधी ताऱ्यातुन
झुळझुळतात तराणे-तराणे
माझे जीवन गाणे

गा विहगांनो माझ्यासंगे
गा विहगांनो माझ्यासंगे
सुरावरी हा जीव तरंगे
सुरावरी हा जीव तरंगे

तुमच्यापरी माझ्याही सुरांतुन
उसळे प्रेम दिवाणे-दिवाणे
माझे जीवन गाणे-गाणे
माझे जीवन गाणे

माझे जीवन गाणे
जीवन गाणे, जीवन गाणे



Credits
Writer(s): Mangesh Padgaokar, P L Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link