Shenduri Murti Konachi

शेंदूरी मूर्ती कोणाची? या सप्तशृंगीची
शिखराला कीर्ती कोणाची? या सप्तशृंगीची
(शेंदूरी मूर्ती कोणाची? या सप्तशृंगीची)
(शिखराला कीर्ती कोणाची? या सप्तशृंगीची)

शक्ती ही न्यारी, गाथा ही न्यारी या जगदंबेची
भक्ताला तारी, कृपा ही न्यारी या सप्तशृंगीची
(शेंदूरी मूर्ती कोणाची? या सप्तशृंगीची)
(शिखराला कीर्ती कोणाची? या सप्तशृंगीची)

धरतीवरी हे भगवती भीमासुराला मारिले तु
(भीमासुराला मारिले तु)
देवादिका, ऋषीमुनी ते, भक्तजनाला तारीले तु
(भक्तजनाला तारीले तु)

तारीले तु, तारीले तु, भक्तजनाला तारीले तु
(सप्तशृंगीचा उदो-उदो)

शेंदूरी मूर्ती कोणाची? या सप्तशृंगीची
शिखराला मूर्ती कोणाची? या सप्तशृंगीची

शिखरावरी हे भगवती शेंदूरी मूर्ती आम्हा दिसे
(शेंदूरी मूर्ती आम्हा दिसे)
सतीचा कडा धन्य गं तुझा खडकाला दिसे चाकाचे ठसे
(खडकाला दिसे चाकाचे ठसे)

सतीचा कडा, सतीचा कडा, धन्य तुझा गं सतीचा कडा
(सप्तशृंगीचा उदो-उदो)

शेंदूरी मूर्ती कोणाची? या सप्तशृंगीची
शिखराला कीर्ती कोणाची? या सप्तशृंगीची

१८ भुजा रूपे माऊली डोंगरावरी ही अंबिका वसे
(डोंगरावरी ही अंबिका वसे)
चंडिका तु गं, कालिका तु गं अनेक रुपात भगवती दिसे
(अनेक रुपात भगवती दिसे)

चंडिका तु गं, कालिका तु गं अनेक रुपात भगवती दिसे
(सप्तशृंगीचा उदो-उदो)

शेंदूरी मूर्ती कोणाची? या सप्तशृंगीची
शिखराला कीर्ती कोणाची? या सप्तशृंगीची
(शेंदूरी मूर्ती कोणाची? या सप्तशृंगीची)
(शिखराला कीर्ती कोणाची? या सप्तशृंगीची)

शक्ती ही न्यारी, गाथा ही न्यारी या जगदंबेची
भक्ताला तारी, कृपा ही न्यारी या सप्तशृंगीची



Credits
Writer(s): Sagar Pawar, Nitin Morajkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link