Yuge Atthavees (Vitthal Aarti)

युगे २८ विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा

जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हो, श्री पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)

तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीतांबर कस्तुर लल्लाटी
देव, सुरवर नित्य येती भेटी
गरुड, हनुमंत पुढे उभे राहती

जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हो, श्री पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)

धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राई रखुमाबाई, राणीया सकळा
ओवाळित राजा विठोबा सावळा

जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हो, श्री पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती
दिंड्या, पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती?

जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हो, श्री पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळती

जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हो, श्री पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)

Credits
Writer(s): Bhushan Dua, Shri Samarth Sewa Bhajani Mandal(amanch Bhajan)kolhapur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link