Najraa Yaa Ugaach Valalyaa

नजरा या उगाच वळल्या
नजरा या उगाच वळल्या
क्षितीजाच्या धुंद प्रदेशा
वाऱ्यावर हलके-हलके भेटींच्या भाषा

उगा लावती आस जीवाला...
उगा लावती आस जीवाला ओंजळीतल्या रेषा
कुठे हरवला, कसा साजणा, दूरदूरच्या देशा?
दूरदूरच्या देशा
नजरा या उगाच वळल्या

तू येशील ना रे, हलकेच जरासे
स्वरसाज सुरांचा, रेशीम धागे
तू येशील ना रे, हलकेच जरासे
स्वरसाज सुरांचा, रेशीम धागे
स्वरसाज सुरांचा, रेशीम धागे

झरझरत्या पाण्यावर उठल्या...
झरझरत्या पाण्यावर उठल्या श्वासांच्या या रेषा
कुठे हरवला, कसा साजणा, दूरदूरच्या देशा?
दूरदूरच्या देशा
नजरा या उगाच वळल्या

लाटांनी उगा चोरली आभाळी गाणी
लाटांनी उगा चोरली आभाळी गाणी
नजर तुझी हळूच सांगते आठवणींच्या ओळी
नजर तुझी हळूच सांगते आठवणींच्या ओळी
आठवणींच्या ओळी

हवेत विरल्या क्षितिजावरल्या...
हवेत विरल्या क्षितिजावरल्या भासांच्या या रेषा
कुठे हरवला, कसा साजणा, दूरदूरच्या देशा?
दूरदूरच्या देशा

नजरा या उगाच वळल्या
क्षितीजाच्या धुंद प्रदेशा
वाऱ्यावर हलके-हलके भेटींच्या भाषा

उगा लावती आस जीवाला...
उगा लावती आस जीवाला ओंजळीतल्या रेषा
कुठे हरवला, कसा साजणा, दूरदूरच्या देशा?



Credits
Writer(s): Abhijit Tilak, Rohit Jeevan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link