Kaalubaaichya Gan Dongarawari

कुण्या मेल्यानं, आल्या-गेल्यानं जादू-टोना केला गं
कुण्या मेल्यानं, आल्या-गेल्यानं जादू-टोना केला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं

आधी छातीत उठली कळ, लई जीव माझा तळमळ
आधी छातीत उठली कळ, लई जीव माझा तळमळ
झाली पोटामधी जळजळ, असा भानवतीचा खेळ

असं का होतंय? काय दुख:तंय, जिव येडा झाला गं
असं का होतंय? काय दुख:तंय, जिव येडा झाला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं

माझं काळीज हे धडधड, माझी पाहून ही धडपड
माझं काळीज हे धडधड, माझी पाहून ही धडपड
माझ्या धन्यानं तड का पड मला नेलंया doctor कडं

Doctor बोले, "काही ना झाले", कळं न हे त्याला गं
Doctor बोले, "काही ना झाले", कळं न हे त्याला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं

अशा भयान दुखण्यापायी मी फिरले दिशा दाही
अशा भयान दुखण्यापायी मी फिरले दिशा दाही
बुआ-भगत ठायी-ठायी, असे किती मी पाहिले बाई

एक भगत सांगे, "न्या हिला मांडर गावाला गं"
एक भगत सांगे, "न्या हिला मांडर गावाला गं"
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं

काळूबाईचं घेवून नाव आम्ही गाठला मांडर गाव
काळूबाईचं घेवून नाव आम्ही गाठला मांडर गाव
चंद्रकांतानं मारीत हाक, काळूबाईनं घेतली धाव

लिंबा-नारळाचा, त्या कोंबड्याचा उतारा तो केला गं
लिंबा-नारळाचा, त्या कोंबड्याचा उतारा तो केला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं

कुण्या मेल्यानं, आल्या-गेल्यानं जादू-टोना केला गं
कुण्या मेल्यानं, आल्या-गेल्यानं जादू-टोना केला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं

आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं
आई काळूबाईच्या डोंगरावरी गुण मला आला गं

Credits
Writer(s): Milind Mohite, Vilash Joglekar, Chander Kant Nirbhawane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link