Varbale Sugandh

भोजाजी महाराजांचे मन
कोमल आहे, सुंदर आहे
त्यांचे हृदय विशाल आहे
विठ्ठलाच्या नामस्मरणात राहून

त्यांनी दीन-दुबळ्यांची सेवा केली
कित्येक लोकांना रोगमुक्त केलं
यावरूनच त्यांच्या विशाल हृदयाची प्रचिती येते

दरवळे सुगंध ज्याचा जसे चंदन
दरवळे सुगंध ज्याचा जसे चंदन

भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन
भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन

थोरवी तुझी बा थोरजन गाती
भक्तीच्याच डोही आनंदात न्हाहती
थोरवी तुझी बा थोरजन गाती
भक्तीच्याच डोही आनंदात न्हाहती

राव, रंक, दीन तुला करी वंदन
राव, रंक, दीन तुला करी वंदन

भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन
भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन

नाम विठ्ठलाचे अळवून वाचे
मन घडविले नास्तिक मनाचे
नाम विठ्ठलाचे अळवून वाचे
मन घडविले नास्तिक मनाचे

दुःख पीडितांचे तू करी हरण
दुःख पीडितांचे तू करी हरण

भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन
भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन

तीर्थ, महातीर्थ अमृताची जोड
किमयाच न्यारी नष्ट झाली कोड
तीर्थ, महातीर्थ अमृताची जोड
किमयाच न्यारी नष्ट झाली कोड

तुझ्या गोडवाणीचे नित्य श्रवण
तुझ्या गोडवाणीचे नित्य श्रवण

भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन
भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन

दरवळे सुगंध ज्याचा जसे चंदन
दरवळे सुगंध ज्याचा जसे चंदन

भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन
भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन

भोजाजी, भोजाजी तुझे
कोमल मन रे, कोमल मन



Credits
Writer(s): Vishwash Gayakwad, Prakash Maheshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link