Aai Aai Ye Na Jara

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ
आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ
बाबाच्या डोळ्यामधे पावसाचे ढग
आई जरा बघ, जरा बघ

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ
बाबाच्या डोळ्यामधे पावसाचे ढग
आई जरा बघ, जरा बघ

बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
आळिमिळी गुपचिळी पडलेला वारा
बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
आळिमिळी गुपचिळी पडलेला वारा

हले नाही, डूले नाही जसा काही photo
हले नाही, डूले नाही जसा काही photo
आवाजही त्याला माझा लांबूनच येतो
आई जरा बघ, जरा बघ

उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजुनच कसनुसा दिसे
उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजुनच कसनुसा दिसे

विचारले बाबा काय पाहतोस सांग
बघे म्हणे आभाळाचा लागतो का थांग
काय सांगू पोरी तुला कळणार नाही
आभाळ न आले हाती जमीनही नाही

चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा
हाती नाही काम, गाडा चालायचा कसा
हाती नाही काम, गाडा चालायचा कसा

घोडा झालो तरी काही शिकलोच नाही
विकायाच्या जगामधे टिकलोच नाही
आई जरा बघ, जरा बघ

आणि मग उठूनिया कुशीमधे मागे घेतो
ओले डोळे पुसोनिया ओली पापी घेतो
घाबरतो जीव बाबा असे काय बोले
चित्रातले रंग त्याच्या जसे ओले-ओले

चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कोणी नेला
चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कोणी नेला
हसणारा बाबा कुणी पळवून नेला
हसणारा बाबा कुणी पळवून नेला
आई जरा बघ, जरा बघ

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ
बाबाच्या डोळ्यामधे पावसाचे ढग
आई जरा बघ, जरा बघ
आई जरा बघ, जरा बघ



Credits
Writer(s): Salil Kulkarni, Sandeep Khare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link