Bhimachi Aali Jayanti

सनई ताश्याच्या मंगल सुरात
हो भीमरायची आली वरात
नऊ वर्षाची रमा लहान
नाकी डोळी सुंदर छान
बघती सारे डोळे भरून
कौतुक करती गोड मुखान
सौख्य देईल सदा संसारात
हो भीम रायाची आली वरात
जमल्या सगळ्या आया बाया
नाव रमाला सांगती घ्याया
कान अतुरले नाव ऐकायला
लागली तेव्हा रमा लाजाया
चांद्रमुख तिचे लपवी पदरात
हो भीमरायाची आली वरात
नवरा नवरी खांद्यावरती
वाजत गाजत नाचत आणती
मुंडावळ्या त्या झुलती डुलती
बाशिंग हि चम चम करती
चांदण पडलं जणू अंधारात
हो भीमरायाची आली वरात



Credits
Writer(s): Harshad Shinde, Bansi Salve
Lyrics powered by www.musixmatch.com

Link