Mani Maziya Natale Gokul (Original)

मनी माझिया नटले गोकुळ
मनी माझिया नटले गोकुळ
मी राधा, तू कान्हा प्रेमळ
मी राधा, तू कान्हा प्रेमळ

वाजविता तू मधुर बासरी
नंदन माझ्या फुले अंतरी
वाजविता तू मधुर बासरी
नंदन माझ्या फुले अंतरी

फुटते घागर, भिजते साडी
फुटते घागर, भिजते साडी
खट्याळ हसते कालिंदी जळ
मी राधा, तू कान्हा प्रेमळ

मथुरेच्या रे वाटेवरती
आडविसी मज धरुनी हाती
मथुरेच्या रे...
मथुरेच्या रे वाटेवरती
आडविसी मज धरुनी हाती

खुशाल लुटीसी दही, दूध, लोणी
खुशाल लुटीसी दही, दूध, लोणी
गोपसख्या, तू भारी अवखळ
मी राधा, तू कान्हा प्रेमळ

यमुनाकाठी रास रंगतो
यमुनाकाठी...
यमुनाकाठी रास रंगतो
रमतो आपण, मी पण हरतो

अंध जगाला कशी दिसावी
अंध जगाला कशी दिसावी
अपुली प्रीती, अपुले गोकुळ
मी राधा, तू कान्हा प्रेमळ

मनी माझिया नटले गोकुळ
मी राधा, तू कान्हा प्रेमळ
मी राधा, तू कान्हा प्रेमळ



Credits
Writer(s): Kavi Sudhanshu, Vitlal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link