Gav Asa Ni Manasa Ashi (Original)

हल्या, संबाळ, हल्या
हे हे हल्या, संबाळ, हल्या
गाव असा नि माणसं अशी
नातीगोती जडतंत कशी
गाव असा नि माणसं अशी
नातीगोती जडतंत कशी

कुणी कुणाला जीव लावतंय
पाडतंय् कोणी फशी

गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी
गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी

रूप कुणाचं बिलोरी ऐना
आली भरात माशुक मैना
वय वसंत चैताचा महिना
तरुणपणानं केली तिची दैना
काच अब्रुची फुटून गेली
डाग लागला तिशी

गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी
गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी

काय घडून गेलं मागं
कुठे रक्ताचं जुळलं धागं
नव्या अंगात झालं जागं
तेच नव्यानं वारसा सांगं
या गावाचा पोर कुणीसा
ताठ्यानं पिळतोय मिशी

गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी
गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी

अशी उमेद घेऊन आला
नाही गुमान कुणाची त्याला
उंच आभाला येवढा झाला
केलं ठेंगणं समद्या गावाला
वादलवारा पहाड झेली
छाती त्याची तशी

गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी
गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी
गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी
गाव असा नि माणसं अशी
नाती गोती जडतंत कशी



Credits
Writer(s): Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link