Kale Na Kay Nemke

कळे न काय नेमके तुला बघुन जाहले?
कळे न काय नेमके तुला बघुन जाहले?
मलाच ना बघा मनी पुन्हा-पुन्हा विचारले
...पुन्हा-पुन्हा विचारले
कळे न काय नेमके तुला बघुन जाहले?

उन्हात मी उभी तरी दिसे समोर तारकां
निहाळते मनातला मधाळ चंद्र सारखा
उन्हात मी उभी तरी दिसे समोर तारकां
निहाळते मनातला मधाळ चंद्र सारखा

मिटून लोचनी तुझ्या मिठीत मी शहारले
...मिठीत मी शहारले
कळे न काय नेमके तुला बघुन जाहले?

दुरून काळजावरी तुझिच लाट आदळे
दुरून मंद-मंद सा तुझा सुगंध दरवळे
दुरून काळजावरी तुझिच लाट आदळे
दुरून मंद-मंद सा तुझा सुगंध दरवळे

दुरून वाटते मला कुणीतरी पुकारले
...कुणीतरी पुकारले
कळे न काय नेमके तुला बघुन जाहले?

निघून चाललास का मध्येच साजणा?
अजून राहिल्या किती टिपायच्या तुझ्या खुणा
निघून चाललास का मध्येच साजणा?
अजून राहिल्या किती टिपायच्या तुझ्या खुणा

अजून मी तरी कुठे हवी तशी फुलारले
...हवी तशी फुलारले

कळे न काय नेमके तुला बघुन जाहले?
मलाच ना बघा मनी पुन्हा-पुन्हा विचारले
...पुन्हा-पुन्हा विचारले
कळे न काय नेमके तुला बघुन जाहले?
...तुला बघुन जाहले
...तुला बघुन जाहले



Credits
Writer(s): Raman Randive
Lyrics powered by www.musixmatch.com

Link