Taryas Ya Kadhicha Akash Magto Mi

ताऱ्यास या कधीचा आकाश मागतो मी
सुख राख आपुले तू तुज दु: ख मागतो मी

तू साहते कधीची सल एकलेपणाची
उधळून बंध ये तू अद्वैत मागतो मी

साऱ्याच जीवनाची झाली आता तहान
व्याकूळल्या युगांचे आभास मागतो मी

तू राहतेस कोठे तारांगणा पल्याड
त्या अंतरासवे ये तुज आज मागतो मी



Credits
Writer(s): Madhuri Ashirgade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link