Nijroop Dakhava Ho (Original)

निजरूप दाखवा हो हरी दर्शनास द्या हो
निजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो
निजरूप दाखवा हो...

नरसिंह होवुनीया घुमवीत गर्जनासी
शतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी

भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र व्हा हो
निजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो
निजरूप दाखवा हो...

पार्थास दाविले ते प्रभू विश्वरूप दावा
मुरली मनोहरा यावा वाजवीत पावा

एका करांगुलीने गोवर्धना धरा हो
निजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो
निजरूप दाखवा हो...

राजभ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार
श्रीकृष्ण-विष्णू-राम तोचि विठू महार
तोचि विठू महार

जाळी तना-मनासी ती आग शांतवा हो
निजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो
निजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो
निजरूप दाखवा हो...



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link