Usavale Dhaage

उसवले धागे...
उसवले धागे कसे कधी?
उसवले धागे कसे कधी? सैल झाली गाठ
हो, उसवले धागे कसे कधी? सैल झाली गाठ

पावलांना ही कळेना...
पावलांना ही कळेना का हरवली वाट?
—का हरवली वाट?

उसवले धागे कसे कधी?
उसवले धागे कसे कधी?

का किनारे फितूर झाले वादळाला ऐन वेळी?
कोणत्याही चाहुली वीण का अशी स्वप्ने बुडाली?
हो, का किनारे फितूर झाले वादळाला ऐन वेळी?
कोणत्याही चाहुली वीण का अशी स्वप्ने बुडाली?

मागण्या आधार उरला एक ही न काठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट?
—का हरवली वाट?

उसवले धागे कसे कधी?
उसवले धागे कसे कधी?

सावली म्हटली तरीही भावना असती तिला
सोबतीची आस वेडी का अजून लागे मला?
हो, सावली म्हटली तरीही भावना असती तिला
सोबतीची आस वेडी का अजून लागे मला?

गुंतणे माझे सरेना...
गुंतणे माझे सरेना तु फिरवली पाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट?
—का हरवली वाट?

उसवले धागे कसे कधी?
उसवले धागे कसे कधी?

वाटते आता हवे ते तुझे गंधाळणे
पोळलेल्या या जीवा दे जरासे चांदणे
हो-हो, वाटते आता हवे ते तुझे गंधाळणे
पोळलेल्या या जीवा दे जरासे चांदणे

सोसवेना चालणे हे एकटे उन्हात
पावलांना ही कळेना का हरवली वाट?
—का हरवली वाट?

उसवले धागे कसे कधी?
उसवले धागे कसे कधी?



Credits
Writer(s): Guru Thakur, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link