Yei Ho Vitthale - Vitthal Aarti

येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर, निढळावरी कर
ठेवुनी वाट मी पाहे, ठेवुनी वाट मी पाहे
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

आलिया गेलीया हाती धाडी निरोप
आलिया गेलीया हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे
माझा माय-बाप, माझा माय-बाप
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला?
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला?
गरुडावर बैसुनी, गरुडावर बैसुनी
माझा कैवारी आला, माझा कैवारी आला
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये

विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा, विष्णुदास नामा
जीवे भावे ओवाळी, जीवे भावे ओवाळी
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये



Credits
Writer(s): Sanjeevani Bhelande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link