Kuthla Rasta

कुठला रस्ता, कुठली वळणं, कसला हा अंधार?

कसल्या भिंती, कसलं घरटं, कसला हा संसार?
कापरा वारा बेभान सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटंवरती दैवाचे बी वार
झालं बंद आता, देवा, कसला रं आधार

चालून थकलं पाऊल आता
थांबतं मनात समद काही
उन्ह-उन्ह झालं झाड पाखराचं
सावली कुठचं आज न्हाई

वणव्याच्या ज्वालांनी घेरल्या दिशा
ठिणग्यांनी सावल्या पेटल्या जशा
जगण्या-मरणाचा अवतार

कुठला रस्ता, कुठली वळणं, कसला हा अंधार?
कसल्या भिंती, कसलं घरटं, कसला हा संसार?
कापरा वारा बेभान सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटंवरती दैवाचे बी वार
झालं बंद आता, देवा, कसला रं आधार

जल्माची साऱ्या सांगा कहाणी
तळहाती तुटलेल्या रेषा
फिरत्यात सारं नशिबाचं फेर
जगण्याची वणवणती भाषा

कळला ना नियतीचा अर्थ हा कुणा
हसण्यावर नसण्याचा सूड का पुन्हा?
जगण्या-मरणाचा अवतार

कुठला रस्ता, कुठली वळणं, कसला हा अंधार?
कसल्या भिंती, कसलं घरटं, कसला हा संसार?
कापरा वारा बेभान सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटंवरती दैवाचे बी वार
झालं बंद आता, देवा, कसला रं आधार



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link