Prarthana

टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे
टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे

आज उशाला दगड घेऊया रे
आज उशाला दगड घेऊया रे
आणि उदयाला शब्द लिहूया रे
आम्ही जगाचं पांग फेडणार
नाही आम्ही हो राग ओढणार
आम्ही मनाचा थांग जोडणार
आम्ही मनाचा थांग जोडणार

टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे
नव्या-जुन्याची नाळ होऊया रे
मण्या-मण्यांची माळ होऊया रे
नव्या जगाचं गीत गाऊया रे
नव्या जगाचं गीत गाऊया रे

टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे
दिव्या दिव्यांची वात पेटताना
पुऱ्या दिसांना रात भेटताना
संत सज्जनांची जीत होऊया रे
संत सज्जनांची जीत होऊया रे

टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे

आज उशाला दगड घेऊया रे
आज उशाला दगड घेऊया रे
आणि उदयाला शब्द लिहूया रे



Credits
Writer(s): Amit B Sawant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link