Ghumshyan Angaat Aal

धुमशान अंगात आल, कस-नस मनात झाल
ए, धुमशान अंगात आल, कस-नस मनात झाल
मजा करूया जरा, नि करू जरा उम्मा-उम्मा-उम्मा
ए, मजा करूया जरा, नि करू जरा उम्मा-उम्मा-उम्मा

हे असच झाल काल, नको होऊस तू बेताल
समोर बघ ना जरा, ना इथे नको उम्मा-उम्मा-उम्मा
ए, समोर बघ ना जरा, ना इथे नको उम्मा-उम्मा-उम्मा

ये इथे थांबलास का?
मी नाय, गाडी थांबल्याय गं
ये गाडी तापल्याय का?
न्हाय-न्हाय नाही, गडी तापलाय गं
जाऊया आता आधी घरी, औषिध देते काहीतरी
या आजारा नाही औषिध काही, लागुदे गार-गार वारा

वारा लागता गार, तू जोसात येशी फार
तुला वारा लागता गार, तू जोसात येशी फार
समोर बघ ना जरा, ना इथे नको उम्मा-उम्मा-उम्मा
अगं, मजा करूया जरा, नि करू जरा उम्मा-उम्मा-उम्मा

ये तू रुसलास का?
होय-होय, भारी रुसलोय मी
ये काही बोल्लास का?
न्हाय-न्हाय, कुठ बोल्लोय मी
राग उतरला नाकावरी, मिठीत घे ना आता तरी
आता का घाई, लाजायचं नाही, करून घे नखरे बारा

नको तू बोलू काही, किती वेळ दवडशी बाई
आता नको ना बोलू काही, किती वेळ दवडशी बाई
मजा करूया जरा, न करू जरा उम्मा-उम्मा-उम्मा
ए, मजा करूया जरा, न करू जरा उम्मा-उम्मा-उम्मा



Credits
Writer(s): Patki Ashok, Apte Vivek
Lyrics powered by www.musixmatch.com

Link