Hi Nasha

स्वप्नाप्रमाणे का वाटते सारे
प्रेमधून हळवी छेडताना
सुटले उखाणे गंधीध श्वासांचे
नाते गुलाबी जोडताना

मोरपंखी स्पर्श झाले, सावल्यांना रंग आले
मोगऱ्याने श्वास लागे, पैंजणांचा नाद बोले
ही नशा ओढ लावी दर्द हवासा (दर्द हवासा)
ही नशा ओढ लावी दर्द हवासा (दर्द हवासा)

स्वप्नाप्रमाणे का वाटते सारे?
प्रेमधून हळवी छेडताना
सुटले उखाणे गंधीध श्वासांचे
नाते गुलाबी जोडताना

हे कुणाचे शब्द ओठी? का नव्याने याद येती?
सप्तरंगी गीत गाती, ओळखीची साद देती
ही नशा ओढ लावी दर्द हवासा (दर्द हवासा)
ही नशा ओढ लावी दर्द हवासा

या मनाचे त्या मनाशी जुळले कसे
हे आज रे धागे नवे
स्पदनांचे स्पदनांना कळले आता
हे अर्थ रे वेडे-पिसे

कोणी परके खास व्हावे, दूरवरचे पास यावे
चाहुलींनी दारवळावे, या क्षणाशी घुटमळावे
ही नशा ओढ लावी दर्द हवासा
ही नशा ओढ लावी दर्द हवासा

बदलून गेले अंदाज जगण्याचे
हरवून येतो मी स्वतःला
सुखाच्या सरींचे ओले शहारे हे
हळूवारू मौसम उमलताना

अंथरावे पाकळ्यांना, पांघरावे चांदण्यांना
नीज येता पापण्यांना, जाग यावी भावनांना
ही नशा ओढ लावी दर्द हवासा (दर्द हवासा)
ही नशा ओढ लावी दर्द हवासा



Credits
Writer(s): Ajit Ankush Parab, Mandar Shashikant Cholkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link