Gaarva (Version 2)

पाऊस पडून गेल्यावर
मन पागोळ्यांगत झाले
पाऊस पडून गेल्यावर
मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती
पाण्यावर रांगत गेले
थेंबांना सावरलेल्या
त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर
मी भिजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर
मन थेंबांचे, गारांचे
आईस चकवूनी आल्या
त्या डबक्यांतील पोरांचे
मोडून मनाची दारे
इवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर
या ओल्या रस्त्यांवरती
पाऊस पडून गेल्यावर
मी चंद्रचिंब भिजलेला
पाऊस पडून गेल्यावर
मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या साऱ्या
विझलेला, शांत निजलेला

पाऊस पडून गेल्यावर
मन भिरभीरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर
मन गारठता गारवा

गारवा
गारवा
वाऱ्यावर भिर-भिर-भिर पारवा
नवा नवा
प्रिये, नभात ही
चांदवा नवा नवा
गारवा

गवतात गाणे झुलते कधीचे
गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे, हिरव्या नदीचे
हिरवे किनारे, हिरव्या नदीचे

पाण्यावर सर-सर-सर काजवा
नवा नवा
प्रिये, मनात ही
ताजवा नवा नवा
गारवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे

अंगभर थर-थर-थर नाचवा
नवा नवा
प्रिये, तुझा जसा
गोडवा नवा नवा

गारवा
वाऱ्यावर भिर-भिर-भिर पारवा
नवा नवा
प्रिये, नभात ही
चांदवा नवा नवा
गारवा

गारवा



Credits
Writer(s): Milind Madhav Ingle, Saumitra
Lyrics powered by www.musixmatch.com

Link