Manaat Bharli Pandhari

जाईन म्हणते माहेरी
पांडुरंगाच्या दरबारी
बाई हसत नाचत

पांडुरंगाच्या दरबारी
बाई हसत नाचत

मनात भरली पंढरी
जाईन म्हणते माहेरी
पांडुरंगाच्या दरबारी
बाई हसत नाचत

चंद्रभागेचं वाळवंट,
तेच आमचं वैकुंठ
आनंद भरला घनदाट
बाई हसत नाचत

मनात भरली पंढरी
जाईन म्हणते माहेरी
पांडुरंगाच्या दरबारी
बाई हसत नाचत

पांडुरंगाच्या दरबार
संत मिळावे अपार
हरीनामाचा गजर
बाई हसत नाचत

डोळ्यात भरला तुकोबा
मनात भरला ज्ञानोबा
मुखात भरला विठोबा
बाई हसत नाचत
मनात भरली पंढरी
जाईन म्हणते माहेरी
पांडुरंगाच्या दरबारी
बाई हसत नाचत

आपण सगळे जाऊया
गोपाळपूर पाहूया
हरीच्या लाह्या खाऊया
बाई हसत नाचत

मनात भरली पंढरी
जाईन म्हणते माहेरी
पांडुरंगाच्या दरबारी
बाई हसत नाचत

अमृतवाणी खरोखरी
दास दासी वारकरी
विठ्ठल उभा विटेवरी
बाई हसत नाचत
मनात भरली पंढरी
जाईन म्हणते माहेरी
पांडुरंगाच्या दरबारी
बाई हसत नाचत

पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा
पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा
पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा
पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा

End



Credits
Writer(s): Radha Krishnaji Maharaj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link