Nakalat Vinale Jate Jale

नकळत विणले जाते जाळे, नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन
(होते मन, होते मन)

नकळत विणले जाते जाळे, नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन

हे नाते कोणते? हे धागे कोणते?
कुणीतरी फुलते दूरवर, दरवळते इथे मन

अलगद नव्या रंगात न्हाते धरा
अवचित कसा होतो खुला पिंजरा?

सहजच येते साद नभाची, सहज पाखरु होते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन

हे नाते कोणते? हे धागे कोणते?
कुणीतरी फुलते दूरवर, दरवळते इथे मन

मौनातुनी झरते जसे चांदणे
शब्दातले जाते कुठे बोलणे
मौनातुनी झरते जसे चांदणे
शब्दातले जाते कुठे बोलणे

कोण छेड़ते अबोल तारा? अबोल जैसे आहे मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन

हे नाते कोणते? हे धागे कोणते?
कुणीतरी फुलते दूरवर, दरवळते इथे मन

केव्हातरी येतात लहरी अश्या
रेंगाळती वाळूत लाटा जश्या
केव्हातरी येतात लहरी अश्या
रेंगाळती वाळूत लाटा जश्या

क्षणभर दिसतो एक किनारा, क्षणभर वेडे जळते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन

हो, हे नाते कोणते? हे धागे कोणते?
कुणीतरी फुलते दूरवर, दरवळते इथे मन

नकळत विणले जाते जाळे, नकळत गुंतत जाते मन
जिवलग होते कुणीतरी अन स्वतःस परके होते मन

Credits
Writer(s): Vaibhav Pralhad Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link