Kokil Kuhu Kuhu Bole

कोकीळ "कुहुकुहू" बोले
कोकीळ "कुहुकुहू" बोले
तु माझा, तुझी मी झाले
तु माझा, तुझी मी झाले
कोकीळ "कुहुकुहू" बोले

ऋतुराजा, ऋतुराजा, तुझी वासंती
तरूतळी इथे एकांती
ऋतुराजा, तुझी वासंती
तरूतळी इथे एकांती

कर कोमल देता हाती
कर कोमल देता हाती
चांदण्यात दिवसा न्हाले

कोकीळ "कुहुकुहू" बोले
तु माझा, तुझी मी झाले
कोकीळ "कुहुकुहू" बोले

मोहरून डहाळीवरती
आपुली हिंदोळत प्रीती
मोहरून डहाळीवरती
आपुली हिंदोळत प्रीती

निर्झरात टिपण्या मोती
पाखरु जिवाचे आले

कोकीळ "कुहुकुहू" बोले
तु माझा, तुझी मी झाले
कोकीळ "कुहुकुहू" बोले

तु येता...
तु येता सखया, जवळी
फुलवेल तरुला कवळी

मधुमरंद भरतो कमळी
मधुमरंद भरतो कमळी
अंतरात मिटता डोळे

कोकीळ "कुहुकुहू" बोले
तु माझा, तुझी मी झाले
कोकीळ "कुहुकुहू" बोले



Credits
Writer(s): Vasant Prabhu, P Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link