Apamanache Baan Vishari

अपमानाचे बाण विषारी अखंड करती मारा
देव घरातील देवीला जणू मिळे अंगणी थारा
जगी कुणा नाही चुकला नशिबाचा फेरा
जगी कुणा नाही चुकला नशिबाचा फेरा

पुण्याईचं बळ तुझं नको सोडू धीर
अंधारात वाट दावी ज्योत एक दूर
पुण्याईचं बळ तुझं नको सोडू धीर
अंधारात वाट दावी ज्योत एक दूर

पुसेल ही माया तुझ्या डोळ्यातील पाणी
पुसेल ही माया तुझ्या डोळ्यातील पाणी
माहेरची पाहुनी, माहेरची पाहुनी
माहेरची पाहुनी

आईच्या या पदराची सावली ही सरली
मैतरीन संगतीला कुणी नाही उरली
वळुनिया बघतांना नजर केविलवाणी
वळुनिया बघतांना नजर केविलवाणी

माहेरची पाहुनी, माहेरची पाहुनी



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Manohar Golambare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link