Tujhe Hasane Madak Mohak

तुझे हासने मादक, मोहक
झरझर झरते मोती
चांदणे शिंपित चालत जाशी
लहरत अवती-भवती

हो, तुझे हासने मादक, मोहक
झरझर झरते मोती
चांदणे शिंपित चालत जाशी
लहरत अवती-भवती

काय देऊ मी उपमा, सखी गं?
काय देऊ मी उपमा, सखी गं?
तूच आहे तुझ्यासारखी गं
तूच आहे तुझ्यासारखी गं

तू गं येताच येई बहार
ऋतु होई असा गुलजार
दूर राहुनी डोळ्यासमोर
चांद नभीचा पाहे चकोर

तुझे नयन हे असे बिलोरी
निळसर गहरे पाणी
भाव निरागस लोभस सांगे
माधुर्याची कहाणी

काय देऊ मी उपमा, सखी गं?
काय देऊ मी उपमा, सखी गं?
तूच आहे तुझ्यासारखी गं
तूच आहे तुझ्यासारखी गं

वटरुळते तुझ्या गालावरती
सोनचाफा तशी गौरकांती
मिटे पापणी, लाज झुके गं
हिरे माणिक पडती फिके गं

अवखळता ही अलगद धरली
रम्य या तालावरती
पाण्यातील ही सूर जसे हो
ओठातून ओघळती

काय देऊ मी उपमा, सखी गं?
काय देऊ मी उपमा, सखी गं?
तूच आहे तुझ्यासारखी गं
तूच आहे तुझ्यासारखी गं

तुझे हासने मादक, मोहक
झरझर झरते मोती
चांदणे शिंपित चालत जाशी
लहरत अवती-भवती

काय देऊ मी उपमा, सखी गं?
काय देऊ मी उपमा, सखी गं?
तूच आहे तुझ्यासारखी गं
तूच आहे तुझ्यासारखी गं



Credits
Writer(s): Sanjayraj Gaurinandan, Rajesh Bamugade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link