Kshanat Lapun Jaate

क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून
जसे काही श्रावणाचे सोनसडी ऊन्ह
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून

किती आलो दूर-दूर तरीही अजून
वाऱ्यावर वाहताहे तुझी-तुझी धून
किती आलो दूर-दूर तरीही अजून
वाऱ्यावर वाहताहे तुझी-तुझी धून

पळतात ढग तुझा सांगावा घेऊन
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून

शोधाया निघालो, राणी, असे एक गाव
पात्या-पात्यावर जिथे दिसे तुझे नाव
शोधाया निघालो, राणी, असे एक गाव
पात्या-पात्यावर जिथे दिसे तुझे नाव

जिथे तुझा गंध करी फुलांना तरूण
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून

(ला-ला-ला ला-ला-ला-ला ला)
(ला-ला-ला ला, ला-ला-ला ला)

जाणवती आसपास कसे तुझे भास
वाटे आता थांबणार अवघा प्रवास
(ला-ला, ला-ला, ला-ला, ला-ला)
जाणवती आसपास कसे तुझे भास
वाटे आता थांबणार अवघा प्रवास

मला तरी स्वप्ने सारी येतील रूजुन
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून
जसे काही श्रावणाचे सोनसडी ऊन्ह

क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून
क्षणात लपून जाशी, क्षणात दिसून



Credits
Writer(s): Salil Kulkarni, Sandip Khare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link