Apsara Aali

हो, कोमल काया की मोहमाया? पुनवचांदणं न्हाली
सोन्यात सजले, रूप्यात भिजले रत्नप्रभा तनू ल्याली
ही नटली-थटली, जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली, पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली, रत्नप्रभा तनू ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदणं न्हाली

हो, छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार
छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार

ही रती मदभरली दाजी ठिणगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्याची
ही नटली-थटली, जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली, पाहुन थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली, रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली, पुनवचांदणं न्हाली



Credits
Writer(s): Ajay Atul, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link