Sajan Dari Ubha

पिया बिन तरसत रहू दिन रैना
पिया बिन तरसत रहू दिन रैना
पिया बिन तरसत रहू दिन रैना
पिया बिन तरसत रहू दिन रैना, दिन रैना
सजन बिन जिया बैचेन, बरसत मोरे नैन
पिया बिन तरसत रहू दिन रैना

सजण दारी उभा, काय आता करू?
सजण दारी उभा, काय आता करू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?
सजण दारी उभा

मी न केली सखे, अजुन वेणीफणी
मी न केली सखे, अजुन वेणीफणी
मी न पुरते मला निरखिले दर्पणी
अन् सडाही न मी टाकिला अंगणी
राहिले नाहणे, राहिले नाहणे, कुठुन काजळ भरू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?
सजण दारी उभा

मी न दुबळी कुडी अजुन शृंगारली
मी न सगळीच ही आसवे माळिली
मी न दुबळी कुडी अजुन शृंगारली
मी न सगळीच ही आसवे माळिली
प्राणपूजा न मी अजुनही बांधिली
काय दारातुनी, काय दारातुनी परत मागे फिरू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?
सजण दारी उभा

बघ पुन्हा वाजली थाप दारावरी
बघ पुन्हा वाजली थाप दारावरी
हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी
तीच मी राधिका, तोच हा श्रीहरी
हृदय माझे कसे, हृदय माझे कसे मीच हृदयी धरू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?
सजण दारी उभा



Credits
Writer(s): Suresh Bhat, Saleel Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link