Naman Tuzhla Swami Samartha

नमन तुजला स्वामी समर्था
नमन तुजला स्वामी समर्था
ओवाळू पंचारती, ओ, ओवाळू पंचारती
गाऊ तंव कृपेची महती
गाऊ तंव कृपेची महती

सद्गुरू आई, भक्त वत्सला
सद्गुरू आई, भक्त वत्सला
सद्बुद्धी दे तुझ्या भक्ताला

चरणपादुका दिल्या भक्तांना
चरणपादुका दिल्या भक्तांना
प्रसादाच्या प्रती, ओ, प्रसादाच्या प्रती
गाऊ तंव कृपेची महती
गाऊ तंव कृपेची महती

भक्ता मनीचे जाणतो स्वामी
भक्ता मनीचे जाणतो स्वामी
सद्गुरुराया, अंतरयामी

स्वामी घेती जनकल्याणा
स्वामी घेती जनकल्याणा
अवतार भु-वरती, ओ, अवतार भु-वरती
गाऊ तंव कृपेची महती
गाऊ तंव कृपेची महती

भिऊ नको तू, उभा मी पाठीशी
भिऊ नको तू, उभा मी पाठीशी
वचन स्वामींनी दिधले जगाशी

मनोभावे भक्ती करिता
मनोभावे भक्ती करिता
येतसे प्रचिती, ओ, येतसे प्रचिती
गाऊ तंव कृपेची महती
गाऊ तंव कृपेची महती

नमन तुजला स्वामी समर्था
नमन तुजला स्वामी समर्था
ओवाळू पंचारती, ओ, ओवाळू पंचारती
गाऊ तंव कृपेची महती
गाऊ तंव कृपेची महती

गाऊ तंव कृपेची महती
गाऊ तंव कृपेची महती



Credits
Writer(s): Janardan, Mohan, Raghunath Matkari
Lyrics powered by www.musixmatch.com

Link