Mendichya Panavar (Remix)

मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते गं
मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते गं
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं
मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते गं

झुळझुळतो अंगणात तोच गार वारा
झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं
हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा गं
मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते गं

अजुन तुझे हळदीचे अंग-अंग पिवळे गं
अजुन तुझे हळदीचे अंग-अंग पिवळे गं
अजुन तुझ्या डोळ्यांतिल मोठेपण कवळे गं
—कवळे गं

मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते गं
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं
मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते गं



Credits
Writer(s): Suresh Bhat, Chinar Mahesh, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link