Nadavala Pakharu

नादावलं पाखरू मनीच, सावर साजना

नादावलं पाखरू मनीच, सावर साजना
नादावलं पाखरू मनीच, सावर साजना
वेडावला माझा जीव असा कसा, जरा मला सांगना?

ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
मनातली प्रिती तुझ्या ओठावर सखे जरा आणना

नादावलं पाखरू मनीच, सावर साजना
नादावलं पाखरू मनीच

सागराची ओढ का नदीला खुनावते रे?
पावसाची रात का मनाला सतावते रे?

हो, सागराची ओढ का नदीला खुनावते रे?
पावसाची रात का मनाला सतावते रे?

गुंफन नाजुकशी अतुट नात्याची
त्यावर रुलई गं गहिऱ्या प्रेमाची
जरा पहावी चारुनी सखे तुझ्या मना

ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
मनातली प्रिती तुझ्या ओठावर सखे जरा आणना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे

भिजताना चांदण्यात का रे उठे शहारा?
पहाटेस साद देई कोणी, अबोल तारा

हो, भिजताना चांदण्यात का रे उठे शहारा?
पहाटेस साद देई कोणी, अबोल तारा

तुलाच गवसेन, तुझ्यातला सुर
नविन स्वप्नांचा नवा-नवा नुर
जशी-जशी फुलेल ही अजाण भावना

नादावलं पाखरू मनीच, सावर साजना
नादावलं पाखरू मनीच, सावर साजना
वेडावला माझा जीव असा कसा, जरा मला सांगना?

ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
मनातली प्रिती तुझ्या ओठावर सखे जरा आणना

नादावलं पाखरू मनीच, सावर साजना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना



Credits
Writer(s): Kedar Pandit, Nachiket Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link