Aakash Jhale - Lullaby

आकाश झाले हळवे जरासे, आले भरूनसे
ढगांचे किनारे अवेळी वहावे, आले गळूनसे
नको जीव लावू अशा पावसाला, तो आहे इथे पाहुणा
पंख फुटून गेला उडून तरी फुलवेल मना
ओलावा पेरून जाई निघून ढगांचा पुढे गारवा

लाट फिरुनी किनारी परतली, पाण्यानं भरले ठसे
वाळूत गिरवले, शब्द हरवले, नाते बदलले असे
तरी जीव माझा जपून जरासा मी आहे इथे ठेवला
उबेची दुलई जणु मीच आई झाले निघत्या क्षणा
ओलावा पेरून जाई निघून ढगांचा पुढे गारवा



Credits
Writer(s): Karan Kulkarni, Tejas Modak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link