Prabhatgeet

कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे गं अंतरयामी
चांदणराती अशा एकांती मनसागर उसळं मिलनाची उर्मी
लखलख चंदेरी आभाळ होते, माझ्या मनी ही प्रीत जागते
प्रियतम, भेटाया तुज आले मी कळलं का?

कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे गं अंतरयामी
चांदणराती अशा एकांती मनसागर उसळं मिलनाची उर्मी

मेघसावळा माझा राया, भोळा-भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया, माझा राया गं
मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मानाचा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया, माझा राया गं

माझं काळीज, तू माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
ह्या संसाराला देवाजीची छाया गं
मेघसावळा माझा राया, भोळा-भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया, माझा राया गं

मन माझे उमलून गेले, स्पर्श तुझा झाला
मन माझे उमलून गेले, स्पर्श तुझा झाला
प्रीतीचा बहर बघ आला, हा वेड लावूनी गेला
प्रीतीचा बहर बघ आला...

होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन जगण्याला अर्थ नवा आला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला

(Hey, पोरी थांब)
मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा (असं)
अरे, उभ्या पिकामधी आडवा घुसतोय हाय कोण ह्यो पाहुणा?
मी दाबून बघतोया कणसं भरला हाय का दाणा
मी दाबून बघतोया कणसं भरला हाय का दाणा

मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा (असं)
उभ्या पिकामधी आडवा घुसतोय हाय कोण ह्यो पाहुणा?
मी दाबून बघतोया कणसं भरला हाय का दाणा
मी दाबून बघतोया कणसं भरला हाय का दाणा

तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासांत तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू?
सजणा, याद ही, याद ही, छळते तुझी याद रे
सजणा, याद ही, याद ही, छळते तुझी याद रे

तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का गं सखे दूर तू?
सजनी, याद ही, याद ही, छळते तुझी याद गं
सजणा, याद ही, याद ही, छळते तुझी याद रे



Credits
Writer(s): Gogavale Atul, Gogavale Ajay, Sable Shahir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link