Maharajanchi Kirti Befaam - Powada

महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती
महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला
याला कोण घालिल येसन, दरबारी पुसती बेगम

बडी बेगम, म्हणजे अली आदिलशहाची आई बर का

नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार
कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार

इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला
"मै लाऊंगा शिवाजी को"
अन त्यान विडा उचलला

नाव त्याच अफजलखान
ये, नाव त्याच अफजलखान
जिता जागता जणू सैतान
खान बोलला छाती ठोकून
"शिवबाला टाकतो चिरडून"

मरहबा, सुभानअल्लाह

कौतिक झाले दरबारात
खान निघाला मोठ्या गुरमित

त्याच घोडदल, पायदळ
फौजा फाटा लई बक्कल
अंगी दहा हत्तीच बळ
पाहणारा कापे चळचळ

वाटेत भेटेल त्याला चिरडीत
ठेचीत खानाची सेना निघाली
गावं लुटली, देऊळ उध्वस्थ केली
आया बहिणींची आब्रू लुटली
कोण, कोण रोखणार हे वादळ?

आता शिवबाच काही खर नाही

इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज
जो तो हेच बोलू लागला
राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार?
काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार

पण आई जिजाऊ
पण आई जिजाऊ काय म्हणाल्या
"शिवबा केवळ आमचा पुत्र नाही
तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे
या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर
परंतु भ्याडपूर्ण पळून जाऊन
या मराठी मुल्काचा स्वाभिमान गमावता कामा नये"

अश्या वाघिणीचा त्यो छावा, हा
अश्या वाघिणीचा त्यो छावा
गनिमाला कसा ठेचावा
डोक्यात गनिमी कावा
भेटीचा धाडला सांगावा

प्रतापगडावर
प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान
हसत-हसत कबूल केला

दिवस ठरला
दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाण
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, हा

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान
हे, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान
आला बेगुमान, नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची
शिवाजी राजाच्या करामतिची
शिवाजी राजाच्या करामतिची

अन त्यास नाही जाणीव शक्तिची
त्यास नाही जाणीव शक्तिची
त्यास नाही जाणीव शक्तिची

अन करील काय कल्पना युक्तिची, हा जी जी-जी
करील काय कल्पना युक्तिची, हा जी जी-जी
करील काय कल्पना युक्तिची, हा जी जी-जी-जी-जी-जी

खानाच्या भेटीसाठी महाराजानं
एक शानदार शामियाना उभारला होता

भेटीसाठी छान उभारीला
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
नक्षीदार शामियान्याला

अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत, डुलत आला
खान डौलत, डुलत आला
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
सय्यद बंडा त्याच्या संगतीला

शिवबाच्या संगती महाला
शिवबाच्या संगती महाला
बर का, जीवा महारा नावाचा डोंबारी व्हता
अहो, म्हणतात ना "होता जीवा म्हणुन वाचला शिवा"
शिवबाच्या संगती महाला
शिवबाच्या संगती महाला

राजाला पाहून
राजाला पाहून खान म्हणतो कसा
"आओ, आओ शिवाजी
आओ हमारे गले लग जाओ, आओ"

खान हाक मारीतो हसरी
खान हाक मारीतो हसरी
रोखून नजर गहिरी
जी-र-ह जी-र-र जी-जी
जी-र-ह जी-र-र जी-जी
जी-र-ह जी-र-र जी-जी-जी

हाहाहा, पण आपला राजा पण
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता

राजा थोर, बात त्याची न्यारी
राजा थोर, बात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी-र-ह जी-र-र-जी जी-जी
जी-र-ह जी-र-र-जी जी-जी
जी-र-ह जी-र-र-जी जी-जी-जी

खानान राजाला आलिंगन दिलं
अन दगा केला

खान दाबी मान मान्याला
खान दाबी मान मान्याला
कट्यारीचा वार त्यानं केला
कट्यारीचा वार त्यानं केला
खर-खर आवाज झाला
खर-खर आवाज झाला
चिलखत व्हत अंगाला
चिलखत व्हत अंगाला

खानाचा वार फुका गेला
खान यडबडला

इतक्यात महाराजानं
पोतामंदी पिचवा ढकलला
पोतामंदी पिचवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
वाघनखांचा मारा केला
टरटरा फाडल पोटाला

तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी जी-जी
बाहिर आला जी जी-जी
बाहिर आला जी जी-जी

प्रतापगडाचे युद्ध जाहले, हा
प्रतापगडाचे युद्ध जाहले
प्रतापगडाचे युद्ध जाहले
रक्त सांडले, पाप सारे गेले
पावन केला कृष्णेचा घाट
पावन केला कृष्णेचा घाट
पावन केला कृष्णेचा घाट

अन लावली गुलामिची हो वाट
लावली गुलामिची हो वाट
लावली गुलामिची हो वाट

अन मराठेशाहिचा मांडला थाट, जी जी
मराठेशाहिचा मांडला थाट, जी जी
मराठेशाहिचा मांडला थाट, जी जी
मराठेशाहिचा मांडला थाट, जी जी-जी-जी-जी-जी



Credits
Writer(s): Nandesh Upam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link