Guru Vandana Nishshank Hoi Re Manaa

गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः

निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्यही शक्य करतील स्वामी
अशक्यही शक्य करतील स्वामी

जिथे स्वामी चरण तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविण काळही ना नेई त्याला
परलोकही ना भिती तयाला
अशक्यही शक्य करतील स्वामी

उगाची भितोसी भय हे पळू दे
वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा
अशक्यही शक्य करतील स्वामी

खरा होई जागा श्रध्देसहित
कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त?
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हाथ
अशक्यही शक्य करतील स्वामी

विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ
स्वमीच या पंच प्राणांमृतात
हे तिर्थ घेई आठवी रे प्रचिती
न सोडिती तया ज्या स्वामी घेई हाती
अशक्यही शक्य करतील स्वामी

निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्यही शक्य करतील स्वामी
अशक्यही शक्य करतील स्वामी
अशक्यही शक्य करतील स्वामी
अशक्यही शक्य करतील स्वामी



Credits
Writer(s): Chandrashekhar Sanekar, Mayuresh Pai
Lyrics powered by www.musixmatch.com

Link