Chal Uth Re Mukunda - From "Suman Geeten"

चल उठ रे, मुकुंदा, झाली पहाट, झाली
झाली पहाट, झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे, मुकुंदा...

मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन चोरपावलांनी आला पहाटवारा

गालांवरी उषेच्या आली हळूच लाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे, मुकुंदा...

घे आवरून आता...
घे आवरून आता स्वप्नांतला पसारा
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा

तंव गीत गात सारी ही पाखरे उडाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे, मुकुंदा...

तुज दूर हाक मारी कालिंदिचा किनारा
कुंजातल्या फुलांनी केला तुला इशारा

तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे, मुकुंदा...



Credits
Writer(s): Suresh Bhat, Dashrath Pujari
Lyrics powered by www.musixmatch.com

Link