Kuni Tari Bolva (From "Dev Manus")

मी तर जाते जत्रंला
गाडीचा खोंड बिथरला
बरं नाही घरच्या गणोबाला

कुणीतरी...
अहो, कुणीतरी बोलवा दाजिबाला, हो
कुणीतरी बोलवा दाजिबाला

दाजिबासारखा दीर दुनियेमध्ये नाही
गोऱ्या भावजयची त्यांना लई अपूर्वाई
त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई

हेंद्रट आमच्या नशिबाला
हेंद्रट आमच्या नशिबाला
कुणीतरी बोलवा दाजिबाला

कुणीतरी...
अहो, कुणीतरी बोलवा दाजिबाला, हो
कुणीतरी बोलवा दाजिबाला

दाजिबांचा स्वभाव लई गुलहौशी
सजवतील घोडा सांगितल्यासरशी
मला पुढं घेतील हसून चटदिशी

निघता-निघता उशीर झाला
निघता-निघता उशीर झाला
कुणीतरी बोलवा दाजिबाला

कुणीतरी...
अहो, कुणीतरी बोलवा दाजिबाला, हो
कुणीतरी बोलवा दाजिबाला

दाजिबा म्होरं घोड्यावर बसल्या-बसल्या
अंगाला अंग लागतं अन् होती गुदगुल्या
बाळपणीच्या येती आठवणी फार मागल्या

मी लई भुलते रुबाबाला
मी लई भुलते रुबाबाला
कुणीतरी बोलवा दाजिबाला

कुणीतरी...
अहो, कुणीतरी बोलवा दाजिबाला, हो
कुणीतरी बोलवा दाजिबाला

साज-शिणगार केला, ल्याले साखळ्या, तोडे
ऐन्याची घातली चोळी अन् जरीचे लुगडे
अशा मध्ये असावे संगे दाजिबा तगडे
दाजिबा तगडे, दाजिबा तगडे

म्होरं-मागं ठाऊक जोतिबाला
म्होरं-मागं ठाऊक जोतिबाला
कुणीतरी बोलवा दाजिबाला

कुणीतरी...
अहो, कुणीतरी बोलवा दाजिबाला, हो
कुणीतरी बोलवा दाजिबाला

मी तर जाते जत्रंला
गाडीचा खोंड बिथरला
बरं नाही घरच्या गणोबाला

कुणीतरी...
अहो, कुणीतरी बोलवा दाजिबाला, हो
कुणीतरी बोलवा दाजिबाला



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link