Vara Suthe Sukhacha (From "Aadhar")

वारा सुटे सुखाचा
आनंद मेघ आले
मी अमृतात न्हाले, ओ
वारा सुटे सुखाचा

अनिकेत त्यास लाभे
सिंहासनी निवारा
नौकेस हात द्याया
आला पुढे किनारा

कोमेजल्या लतेचा
होऊन कुंज डोले
मी अमृतात न्हाले, ओ
वारा सुटे सुखाचा

माझी मलाच कैसी
झाले अनोळखी मी
तिन्ही जगात आता
माझ्यापरी सुखी मी

हे भाग्य सोसवे ना
होतात नेत्र ओले
मी अमृतात न्हाले, ओ
वारा सुटे सुखाचा

माझे मला कळे ना
आले घडून कैसे?
उल्केस आज लाभे
चैतन्य तारकेचे

उचलावया शिळा ती
आभाळ नम्र झाले
मी अमृतात न्हाले, ओ
वारा सुटे सुखाचा

आनंद मेघ आले
मी अमृतात न्हाले, ओ
वारा सुटे सुखाचा



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link