Kaise Dil Jeete Apka

ढग वाजे, वीज कडाडे, आसमंत निनादला
सागराला उधाण आले, उसळे लाटा सलामीला
व्यर्थ जगणे तुझ्याविना, हाक देतो गजानना
धाव तु रे, धाव तु रे, धाव तु रे मोरया

तेजस्वी रूप देखणे (मोरया)
नजर भाबडी साऱ्या अवडी (मोरया)
संकटहारी, दुःख निवारी (मोरया)
माथी मिरवूनी गुलाल उधळे (मोरया)

आद्य पूजतो तुला मी देवा हे लंबोदर मोरया
दूर कराया संकट राया हे विघ्नेश्वर मोरया
चुकभुल ही पदरी घ्यावी
सदा आम्हांवर कृपा असावी मोरया
डोळे उघडता मूर्ती दिसावी मोरया

लंबोदराय, तू विघ्नेश्वराय हे शंभोसुताय तू मोरया
आसही तू माझा, श्वास हि तू
आज नजरेने पाहीन रूप तुझे
तूच कर्ता, तूच धर्ता, तूच माझा विघ्नहर्ता
मायबाप विश्वाचा तू मोरया

तुची ध्यास, तूची श्वास जगात्रता विश्वविनायक
जयघोष चाले तुझा मोरया
ध्यानी मनी तुच लोचनी
व्यापून उरला गजानना

श्री पालनहारी विश्वाचा तू मोरया
क्षिणलो आता या संसारी
तारुनी नेई.नौका तिरी
जगती माझा तू उद्धारी तू मोरया



Credits
Writer(s): Anu Malik, Anjaan Sameer
Lyrics powered by www.musixmatch.com

Link