Tujhvin Vinvoo Kuna

तुजविण विणवू कुणा, गणराया?
तुजविण विणवू कुणा?
तूच कृपाळा दैवत माझे
ये भवताराया, देवा

तुजविण विणवू कुणा, गणराया?
तुजविण विणवू कुणा?

ज्ञान द्यावया धाव अनंता
गजवदना मोरया
ज्ञान द्यावया धाव अनंता
गजवदना मोरया

शुक्लांबर तू, पतित पावना
गौरीच्या तनया, देवा
गौरीच्या तनया, देवा
तुजविण विणवू कुणा, गणराया?
तुजविण विणवू कुणा?

जन कल्याणा तूच गणेशा
धाव आता वेगे
जन कल्याणा तूच गणेशा
धाव आता वेगे

या धरणीवर शांती-सुखाचे
जग करण्या जागे, देवा
जग करण्या जागे
गणराया, तुजविण विणवू कुणा?
गणराया, तुजविण विणवू कुणा?

तूच कृपाळा, दैवत माझे
ये भवताराया, देवा
तुजविण विणवू कुणा, गणराया?
तुजविण विणवू कुणा?



Credits
Writer(s): Anil-arun, Shantaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link