Ja Ghananno Ja

तृप्तीचा फुलवीत पिसारा सळसळता ताजा
तृप्तीचा फुलवीत पिसारा सळसळता ताजा
जा, घनांनो जा, जा, घनांनो जा

तहानलेल्या तप्त जिवाला
अमृतमय आधार मिळाला
तहानलेल्या तप्त जिवाला
अमृतमय आधार मिळाला

अशीच तुमची शीतल छाया या मातीला द्या
जा, घनांनो जा, जा, घनांनो जा

नवल फुलले नवसृजनाचे
हिरवे कौतुक आता नव्याचे
नवल फुलले नवसृजनाचे
हिरवे कौतुक आता नव्याचे

रंग असे हे शुभशकुनाचे पुन्हा-पुन्हा उधळा
जा, घनांनो जा, जा, घनांनो जा

तृप्तीचा फुलवीत पिसारा सळसळता ताजा
तृप्तीचा फुलवीत पिसारा सळसळता ताजा
जा, घनांनो जा, जा, घनांनो जा
जा, घनांनो जा, जा, घनांनो जा



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link