Kanherichya Phula

कण्हेरीच्या फुला, कण्हेरीच्या फुला
तुझा पाऊस वेगळा, माझा पाऊस वेगळा

नदीतीरी तू तिथं, अंगणी मी एकटा
नदीतीरी तू तिथं, अंगणी मी एकटा
माझा पाऊस सोहळा, तुझा पाऊस पाचोळा
माझा पाऊस सोहळा, तुझा पाऊस पाचोळा
कण्हेरीच्या फुला, कण्हेरीच्या फुला

गावचा पाऊस भारी, बेभान गं सरी
तडातडा गारा शमे तहान गं उरी
गावचा पाऊस भारी, बेभान गं सरी
तडातडा गारा शमे तहान गं उरी

लाड पाऊस करतो, मला कुशीत गं घेतो
तळं साचूनी गं वेडा, जागा नौकेला या देतो

मला एकटा बघुनी, आज घरात गाठूनी
मला एकटा बघुनी, आज घरात गाठूनी
माझ्या डोळ्यापरि टिपं, त्यानं छतात गाळूनी

तुझा सांगावा दिला, तोही हळवा झाला
तुझा सांगावा दिला, तोही हळवा झाला
ऊन चटक्याचा सोस त्याच्या डोळ्यात वाचला
ऊन चटक्याचा सोस त्याच्या डोळ्यात वाचला

कण्हेरीच्या फुला, कण्हेरीच्या फुला
माझा पाऊस गं लळा, तुझा पाऊसच झळा

गावचा पाऊस म्हणे रानी-वनी जातो
तुझ्या गोडीनं गं धुंद चिंब-चिंब होतो
गावचा पाऊस म्हणे रानी-वनी जातो
तुझ्या गोडीनं गं धुंद चिंब-चिंब होतो

ताल पाऊस धरतो, माझ्या कौलावरी गातो
तुझ्या रंगात न्हाऊनी मनामनात नाचतो

तुझ्याविना फुलण्याचा माझ्या अंगणाला शाप
तुझ्याविना फुलण्याचा माझ्या अंगणाला शाप
व्याप पावसाला किती, तुला नदीतीरी ताप

तुझा नकार घेऊनी तो गं वळवाचा आला
तुझा नकार घेऊनी तो गं वळवाचा आला
असा विरह सोसेना तो गं पुरा कोसळला
असा विरह सोसेना तो गं पुरा कोसळला

कण्हेरीच्या फुला, कण्हेरीच्या फुला
माझा पाऊस गं भोळा, तुझा पाऊस गं चाळा

नदीतीरी तू तिथं, अंगणी मी एकटा
नदीतीरी तू तिथं, अंगणी मी एकटा
माझा पाऊस सोहळा, तुझा पाऊस पाचोळा
माझा पाऊस सोहळा, तुझा पाऊस पाचोळा

कण्हेरीच्या फुला, कण्हेरीच्या फुला
तुझा पाऊस वेगळा, माझा पाऊस वेगळा



Credits
Writer(s): Prajakta Gavhane, Tejas Chavan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link