Ashru

मंदिरात गेलो फक्त दर्शनासाठी
बाहेर येताच गराडा पडला
"काय मागितलं? खरं सांग, काय मागितलंस?"
"काहीच नाही, सारखं काय मागत राहायचं??"

सरळ साधं उत्तर, पण छे! त्यांना पटेल तर शपथ
तसे हट्टी आहेत ते
पापणी हातावर घेऊन सतत काही ना काही मागतंच असतात
कित्ती केवढाल्ल्या ईच्छा त्या

पण साऱ्या कशा एकवटून राहिल्याहेत
फक्त एकाच प्रेरणेकडे, असो
तिथून निघणार तो समोर भिक्षुक
चिल्लरचा खणखणाट झाला
तसा तिने हात वर केला आशीर्वादासाठी

ना माझा नमस्कार दिसला तिला, ना पैसा
तरीही न मागताच दुवा दिल्या तिने
कदाचित लाभतीलही मला त्या
कोण जाणे? समोरच्या बुडूख अंधारात
कित्येक स्वप्न पाहिली असतील तिने

साकार होण्यासाठी कदाचित माझ्या नशीबाला
बहाल करू पहात असावी ती
काहीही असो, मला मनापासून बरं वाटलं दर्शनाने
सोबत तिचे शब्दही कानात घुमत राहिलेच, "काळजी घे"
दोनच शब्द पण काळजाला भिडले

रस्ता ओलांडताच अश्रूंचा बांध फुटला
कधी-कधी आसवांनाही काही कारण लागत नाही
हा देव तरी कसा ना अगदी दाट धुक्यासारखा
समोरचं नीटसं दाखवतही नाही
आणि उजाडल्यावर रहातही नाही



Credits
Writer(s): Prajakta Gavhane, Tejas Chavan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link