Ja Ja Re Sajana (From "Sharan Tula Bhagwanta")

जा-जा-जा, जा-जा रे, साजणा
येऊ नकोस मागे पुन्हा
जरा थांब-थांब, साजणी
असा काय मी केला गुन्हा?

जा-जा-जा, जा-जा रे, साजणा
येऊ नकोस मागे पुन्हा
जरा थांब-थांब, साजणी
असा काय मी केला गुन्हा?
जा-जा-जा, जा-जा रे, साजणा

तुज मी वाहिले प्रेम हे हृदयीचे
परी मी साहीले दुःख गे विरहाचे

(सख्या, सोडणा) जरा थांबना
(सख्या, सोडणा) जरा थांबना
उरती अजुनी आपुल्या त्या खुणा
जा-जा-जा, जा-जा रे, साजणा

दिधले भाव सुमनांचे, फुलले फुल कलिकेचे
दिधले भाव सुमनांचे, फुलले फुल कलिकेचे

जोपासले माझ्या फुला
जोपासले माझ्या फुला
अजुनी ना दिसे तुझिया नयना
जा-जा-जा, जा-जा रे, साजणा

मज तू लाविले वेड तुझ्या जीवाचे
सखे, मी पाहतो स्वप्न तुझ्या स्मृतीचे

(पुरे वंचना) तिन्ही याचना
सलतो सहवास तुझाच पुन्हा

जा-जा-जा, जा-जा रे, साजणा
येऊ नकोस मागे पुन्हा
जरा थांब-थांब, साजणी
असा काय मी केला गुन्हा?
जा-जा-जा, जा-जा रे, साजणा



Credits
Writer(s): Nagesh Arondekar, Nagesh Raj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link