Datato Go Dandat (From "Puri Jara Japun")

वय माझं १६, लवतोय डोळा
नजर ठरं ना कुठं, (का बरं?)
अन अटकर बांधा, गोरा-गोरा खांदा
अंगात झेंडू फुटं (फुटू दे, फुटू दे)

मदन राजानं केली किमया
मदन राजानं केली किमया
ज्वानी झाली बेबंद
दाटतो गं दंडात बाजूबंद
दाटतो गं दंडात बाजूबंद

(तू वयात आलीस बाई, ही चूक तुझी न्हाई)
(तुझ्या ज्वानीनं केलंय वांदा)

दाटतो गं दंडात बाजूबंद
दाटतो गं दंडात बाजूबंद

नवी नभाळी उन्हात न्हाली
टपोर कणसं मधाळ झाली

पानोपानी मोहर भरला
वासानं झाले धुंद
दाटतो गं दंडात बाजूबंद
दाटतो गं दंडात बाजूबंद

काय कळं ना झालं कसं
अंगा-अंगात भरलंय पिसं

गोरी काया उधळीत फिरते
सोन-चाफ्याचा गंध
दाटतो गं दंडात बाजूबंद

धडधड करतंय उरामधी तसं
धडधड करतंय उरामधी
बावरून गेले मनामधी

जागोजागी बसले शिकारी
जागोजागी बसले शिकारी
करतील गं जायबंद
दाटतो गं दंडात बाजूबंद
दाटतो गं दंडात बाजूबंद

(तू वयात आलीस बाई, ही चूक तुझी न्हाई)
(तुझ्या ज्वानीनं केलंय वांदं)

दाटतो गं दंडात बाजूबंद
दाटतो गं दंडात बाजूबंद
दाटतो गं दंडात बाजूबंद



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Viswanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link