Kasa Kunkavacha

कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई

कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई
कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई
कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई

निळं सगून आभाळ...
निळं सगून आभाळ त्यात हळदीची घाई
कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई

दारी मोगरा झुकला जुई चाद येलावरी
दारी मोगरा झुकला जुई चाद येलावरी
फांदीतून शकुनाची शीळ भिरभिर भिरी
मग फुल केली गोळा, मग फुल केली गोळा
आता परडीत नाही

निळं सगून आभाळ...
निळं सगून आभाळ त्यात हळदीची घाई
कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई

मुक्या धुक्याच गोंदण त्यात किनकिनी जुळा
मुक्या धुक्याच गोंदण त्यात किनकिनी जुळा
पावलांच्या खूणासंग वाट बोले घळघळा
कोंब फुटतो दिधाशी...
कोंब फुटतो दिधाशी कशी उरी हिरवाई

निळं सगून आभाळ...
निळं सगून आभाळ त्यात हळदीची घाई
कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई

वारा टाकतो उसासा सजनी गं, सयेबाई
वारा टाकतो उसासा सजनी गं, सयेबाई
कळ पिंपळ पानाची हळू लपेटून घेई
कळ पिंपळ पानाची हळू लपेटून घेई
पदरानं झाकू कशी...
पदरानं झाकू कशी ओल्या सुगीची सराई?

निळं सगून आभाळ...
निळं सगून आभाळ त्यात हळदीची घाई
कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई
कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई

निळं सगून आभाळ...
निळं सगून आभाळ त्यात हळदीची घाई
कसा कुंकवाचा रंग आला पहाटच बाई
...पहाटच बाई
...पहाटच बाई



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link