Jal Dharancha

जल धारांचा चिंब अनावर पान्हा
जल धारांचा चिंब अनावर पान्हा
सजल सघन, घन श्यामल गवळण
सजल सघन, घन श्यामल गवळण
अधर धीर जुळतांना

जल धारांचा चिंब अनावर पान्हा
जल धारांचा चिंब अनावर पान्हा

मधुभाराने लवली खाली
मधुभाराने लवली खाली
वसुंधरेला भोवळ आली
वसुंधरेला भोवळ आली

थेंब-थेंब नक्षत्र मुखावर
थेंब-थेंब नक्षत्र मुखावर
लाजत सावरतांना

जल धारांचा चिंब अनावर पान्हा
जल धारांचा चिंब अनावर पान्हा

हिरव्या श्यामल वाटा कोमल
हिरव्या श्यामल वाटा कोमल
जलामध्ये जल धावे निर्मल
जलामध्ये जल धावे निर्मल

फुलांफुलातून थरथर लागं
फुलांफुलातून थरथर लागं
काटा होऊन कान्हा

जल धारांचा चिंब अनावर पान्हा
जल धारांचा चिंब अनावर पान्हा

स्वर वेणूच्या बरसत धारा
राधा गवळण घुसळी डेरा
स्वर वेणूच्या बरसत धारा
राधा गवळण घुसळी डेरा

शीतल करपूर लोण्यामधुनी
शीतल करपूर लोण्यामधुनी
गूढ हसला कान्हा

जल धारांचा चिंब अनावर पान्हा
जल धारांचा चिंब अनावर पान्हा
सजल सघन, घन श्यामल गवळण
सजल सघन, घन श्यामल गवळण
अधर धीर जुळतांना

जल धारांचा चिंब अनावर पान्हा
जल धारांचा चिंब अनावर पान्हा



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link